‘बहुउपयोगी सायकल’

इ.स.1817 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ ‘karl von Drais’ यांनी दोन चाकी सायकल चालवण्या योग्य तयार केली.
लोंखडी सायकल,विनाइंधनाने आणि शारीरीक ताकदीने चालविण्याचे वाहन. काही वर्षापुर्वी सायकलीचे महत्व आजच्या दुचाकीपेक्षाही मोठे.घरात सायकल असली की,गावात गौरवाची बाब.काम नसले तरी गावातील प्रत्येक कामे सायकलीनेच करायची विशेष आवड.सकाळ पासून ते शेतात जाण्यापर्यंत सायकलच.पायदळपेक्षा सायकलने कमी शारीरिक श्रम व्हायचे.सायकलच्या प्रतिष्ठेच्या वैभवामुळे लग्ना मध्येही जावयास सायकल आवर्जून भेट दिली जात.

आजही आपल्या आयुष्यातील वाहन शिकण्याची सुरुवात ही सायकल पासूनच होते .गरीब असो वा श्रीमंत लहानपणी तीन चाकी सायकल चालवण्याचा अनूभव जवळपास सर्वानाच असतो.पहिल्या वाढदिवसाला तर आवर्जून जवळच्या नातेवाईकांकडून तीन चाकी सायकल गिफ्ट दिल्या जाते.

पूर्वी सायकलवर कुटूंबाचा प्रवास व्हायचा सायकलीमागे असलेल्या कैरीअरवर पत्नी आणि समोरच्या दांड्यावर लहान सिटेवर मुलगा बसून शहरात जाऊन मार्केट,दवाखाना जाण्यास मदत होत.ऐवढेच काय गावाजवळ 15 ते 20 किमीवर अंतरावर असलेल्या गावाला जाऊन नातेवाईकांच्या लग्नाला सायकलनेच प्रवास होत होता. दूध वाटप असो वा इंधनासाठी लाकडे,अन्नधान्य किंवा जिवनाश्यक वस्तुची वाहतूक सायकलीनेच व्हायची.गावामध्ये किंवा परिसरात दहा ते वीस घरामध्येच सायकल राहत.त्यात नवी कोरी सायकल असली की,तिला पाहण्यासाठी वेगळीच गर्दी.सायकलनेच दररोजची कामे करायला मोठा हातभार लागत असे.

परंतू मागील काही वर्षात दुचाकी,आलीशान चार चाकी वाहने,मोपेड यामुळे सायकल कधी हद्दपार झाली हे कळलेच नाही. सायकलने भरपूर शारीरिक श्रम होत असे,त्यामुळे वेगळा व्यायाम करायची गरज नव्हती.आता मागील एका दशकापासून पुन्हा सायकल चालवा,आठवड्यातून एक दिवस तरी वाहने चालवू नका ,सायकलनेच कार्यालयात जा.अशी हाक देण्याची गरज आली आहे.सुजाण नागरिक आपले आरोग्य सांभाळण्यासाठी आजही पहाटे -सायंकाळी सायकल चालवू लागले आहे.

जीममध्येही फिटनेससाठी स्टे सायकलीवर सराव होतांना दिसत आहे.सायकलीचा प्रवास शारिरीक श्रमाचा,त्यामुळे बिना श्रमाचा प्रवास पेटोल-डिझेल गाडीने होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहे.त्यामुळे आता सायकल चालवा रे,,,असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पुर्वी वाहतुकीचे साधन म्हणजे सायकल हो. शारिरिर ताकदीने चालविण्या जाणारे वाहन प्रत्येकाच्या घरात नव्हते,ज्यांच्याकडे होते,तो इतरांपेक्षा श्रीमंतच समजला जात होता. ग्रामिण भागात सायकल ही जीवनााचा अविभाज्य अंग बनली होती. गावातून शहरात शिक्षण घेण्यासाठी सायकल एकमेव आधार होती.आजच्या सारख्या स्कूल बसेस नव्हत्या. त्यामुळे गावातील मुला-मुलींना दहा ते पंधरा किमीचे अंतर सायकलनेच कापावे लागत असायचे.शाळेत जायला मिळते यांच्या आनंदात सायकलने होणारी अधिक परिश्रमही विसरून जायचे.कालांतराने सायकलीची जागा दुचाकी पेट्रोल गाडीने घेतली.शाळा,शिकवणीसाठी कोणतेही शारिरीक श्रम न करता भूर्रर्रकन जाता येते.परंतू सायकलच्या बळावर शिक्षण घेतल्याने आज अनेकजण चांगल्या नोकरीवर,किंवा आपल्या क्षेत्रात चांगला जम बसविला आहे.
सायकल माझ्यासाठीही लाख मोलाची माध्यमिक शिक्षणासाठी गावातून शहराच्या शाळेत नाव टाकले होते.घरापासून शाळा जवळपास 7 ते 10 किलोमिटर अंतरावर.गाव ते शहरात जाण्यासाठी रस्ताही व्यवस्थीत नव्हता.मार्गावर फारशी वर्दळही राहत नव्हती.पुढील शिक्षणासाठी शाळेत जाण्यासाठी सायकली शिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता..,.अशा स्थीतीत सायकलने शाळेत जायला मिळते याचे सुरूवातीला भूषण वाटायचे. तेव्हा अल्टालिक,हिरो आणि बीएसएलआर या कंपन्याच्या सायकलची धुम होती.मुलींसाठी सहसा लोंखडी लेडीज सायकल आणि त्यातही बीएसएलआर कंपनीची सायकली असली की,वेगळेच भूषण वाटायचे.त्या आनंदातच शाळा व घराचे अंतर कमी वाटायचे.घरातून शाळेत जातांना रस्ता चढीचा होता.संपुर्ण शक्तीपणाला लावत सायकल मैत्रीनीसोबत चालवित असे. जिल्हा परिषदेच्या शाळेचा मार्ग प्रारंभी अनोळखीचा होता.परंतू एका महिन्याच्या आतच हा रस्ता आेळखीचा झाला.गावाजवळच्या रस्त्यावर वाहने कमी धावायची परंतू शहरातील रस्ता आला की,वाहने,आटो,मोटरसायकली,बस,ट्रक ही सर्व वाहने पाहून सायकलने मार्ग काढत-काढत शाळेला पोहचत असे.सुरूवातीच्या BSLR सायकलच्या दिवसाच्या आठवणी आजही कायम आहे.
सकाळी 11 वाजता शाळा असायची,वेळेवर पोहचण्यासाठी 10 वाजता निघावे लागत होते.सकाळचे जेवन व दुपारचा टीफीन घेऊन शाळेला स्वयंस्फूतीने निघत.कधी-कधी सायकलने जायला कंटाळा यायचा.पण दुसरा मार्ग नव्हता.घरी नव्हे वार्डातही कुणाकडे गाडी नव्हती.त्यावेळेस आमच्याकडे सायकल तरी होती,.7किमी जाणे आणि 7किमी घरी येणे असे एका दिवसाला 14 कि.मी.चा प्रवास होत होता.पाचवीत म्हणजे 10 ते 12 वर्षाचे जेमतेम वय असेल.पुढे पुढे मात्र सायकलचे फेरे वाढले. 10 वीत गणिताची शिकवणी लावली ती शहरातच ,त्यामुळे पहाटे 6 वाजता सायकलने प्रवास करीत शिकवणीला जायचे ,ति सुटल्यावर पुन्हा घरी यायचे.आणि त्यानंतर अवघ्या दोन तासात पुन्हा शाळेसाठी सज्ज असायचे.असे दररोजच 28 किमी.चे अंतर कापावे लागत . उन्ह ,वारा व पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये सायकलने ये-जा करीत होती.आईला मात्र माझी होणारी फरफट कळत होती.सायकल माध्यमिक आणि कनिष्ठ महाविलयाचया शिक्षणापर्यंत माझ्या सोबत होती.आज ग्रामिण भागातही सायकलीऐवजी बसची सुविधा उपलब्ध झाली आहे.त्यामुळे त्यांना पुर्वीसारखे घाम गाळण्याची गरज नाही.
सागायचे तात्पर्य असे की, पुर्वी मुला-मुलींना एकतर पायदळ किंवा सायकली शिवाय शाळेसाठी पर्याय नव्हता.

सायकल शिकतांना मोठी सर्कस करावी लागत असे.घरातील भाऊ,बहिण आणि मैत्रिण असे सर्व सैनिक सायकल शिकण्यासाठी तप्तर राहत असे.सायकलचा तोल पकडण्यासाठी मागे,बाजुला सायकला पकडून, हातात हॅण्डल व पायडल मारत-मारत समोर जात .सायकल शिकायला उताराचा रस्ता सोयीचा आणि नुकसानीचा ठरत असे.सायकलचे ब्रेक वेळीच न लागले की मोठे महाभारत घडायचे.तरी सायकल शिकण्यांची जिद्द राहत.सायकल एका हाताने पकडून सायकलचा तोल सांभाळने आले की,सायकल शिकली जात.मग एकटच सर्रास पणे रस्त्याने सायकल चालविण्यात वेगळाच आनंद,या सायकल शिकण्यामुळे आज मोपेड चालविणे पहिल्या प्रयत्नांत शक्य होते.आपल्याला सायकल येते,ही कल्पनाच सुखकारक ठरणारी आहे.पुरूषासाठी दांडेवाली तर मुलीसाठी लेडीज सायकल.विद्यार्थीनीसाठी बीएसएलआर सायकलची क्रेझ होती.
मोबाईल,मोटरसायकल सारखी पुर्वी सायकल जीवनातील अविभाज्य घटक होती.सायकलीची क्रेझ तेव्हाच्या मराठी व हिंदी चित्रपटातही उमटली आहे. सोने की सायकल,चांदीकी सिट..हे हिन्दी चित्रपटाचे गाणे आजही आेठावर येते.मराठी चित्रपटात हिरोजवळ सायकल असायचीच.आताही अधून-मधून चित्रपटामध्ये किंवा टीव्ही मालिकांमध्ये सायकलीचा वापर होतो. सायकलचा प्रवास कमी झाला.रस्त्यावर इंधनावर धावणा-या वाहनाची रेलचेल झाली,त्यातून प्रदुषणही वाढले,गोंगाट वाढला,खर्च वाढला,आणि अपघातही वाढले.

मात्र सायकलीच्या जमान्यात .असे काहीच नव्हते.सायकलीपासून माणुस दूर गेल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे.त्यामुळे आज विज्ञान युगात ‘सायकल डे’ पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.शासकीय क्लास वन अधिकारीही सायकल वापरा या उपक्रमाला प्रोत्साहन देत स्वत:पासून प्रारंभ करीत आहे.समाजातील अनेकजणांनी खास सकाळी व्यायाम म्हणून सायकल चालवू लागले आहे.ही संख्या जरी कमी असली तरी सायकलीचे महत्व कायम आहे.अगदी मोबाईलवर नाचणा-या युवा पिढीतही. सायकलला तेव्हा वैभवाचे दिवस होते.या वैभवामुळे मानवी आरोग्य फिट होते.कालांतराने सायकलीचे वैभव लोप पावत आहे.परंतू सायकलीच्या रंजक आठवणी प्रत्येकांच्या जीवनात घर करून असेलच यात शंका नाही.
………………………………………….

3 thoughts on “‘बहुउपयोगी सायकल’

 • July 11, 2020 at 7:54 am
  Permalink

  खरच सायकल हे वाहन नसून एक गरजेचे साधन आहे.

  Reply
 • July 11, 2020 at 3:33 pm
  Permalink

  मला तुझी ब्लॅक कॉलर ची सायकल आठवली

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Bitnami banner
Bitnami